राज्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस

0
91

राज्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. या पावसाने संपूर्ण शहरात सखल भागात पाणी साचले  आहे. या पावसामुळे कन्नड तालुक्यातील औट्रम घाटात दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असुन घाट बंद करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यात दोन सप्टेंबरपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहील. जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here