Kokan: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाच्या कोकण महिला अध्यक्षपदी सौ. अर्चना घारे परब यांची फेरनिवड

0
39
कोकण महिला अध्यक्षपद
कोकण महिला अध्यक्षपदी सौ. अर्चना घारे परब यांची फेरनिवड

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सावंतवाडी –

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाच्या कोकण महिला अध्यक्षपदी सौ. अर्चना घारे परब यांची फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहीणी खडसे यांनी आज सौ. घारे यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र दिले.https://sindhudurgsamachar.in/kokan-गावा-गावातील-प्राथमिक-शा/

सौ. अर्चना घारे परब या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटना बांधणी मजबूत करण्यासाठी सौ. अर्चना घारे परब यांची पक्षाने फेरनिवड केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सौ. अर्चना घारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here