लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी संध्याकाळी अचानक दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. बिहार दौऱ्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. अचानक बिहारचा दौरा रद्द करून त्यांना दिवाळीपूर्वीच दिल्लीत परतावे लागले होते.आता त्यांना सतत ताप येत असल्याचे सांगण्यात येत आहे. एम्सच्या डॉक्टरांनी त्याचे रक्त घेऊन तपासणीसाठी पाठवले आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.