विकी आणि कतरिनाच्या लग्नाची बातमीने मीडियात नुसती चढाओढ लागली आहे. त्यातच या लागलनाला अगदी मोबाइलपासून सगळ्याच गोष्टी बंद केल्याने त्या उत्सुकतेत आणखीनच भर पडली आहे.मीडिया फोटोग्राफर्सनी दोघांच्याही घराबाहेर गर्दी केलेली दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल येत्या 9 डिसेंबर रोजी लग्नाच्या गाठीत अडकणार आहे. खरं तर विकी किंवा कतरिनाच्या घरच्यांकडूनही या लग्नाबद्दल आतापर्यंत काहीही सांगण्यात आलं नसलं तरी या दोघांच्या घरात सुरू असलेली तयारी फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटलेली नाही.
त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी कव्हर करण्यासाठी अनेक फोटोग्राफर्स सध्या त्यांच्या घराबाहेरच बसून आहेत.त्यातच विकीच्या घराबाहेर जमलेल्या फोटोग्राफर्ससाठी विकीचे वडील शाम कौशल यांनी फूड बॉक्स पाठवले असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात विकीचे वडील शाम कौशल यांनी छायाचित्रकारांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे .