देशाच्या वायव्य भागात 26 डिसेंबरपासून चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमान घसरले आहे. राज्यातील बहुतांश भागात थंडीची लाट आली आहे.तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीटचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हरियाणासह उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात गारठा वाढणार आहे.
हवामान खात्याने काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विदर्भात पुढील काही दिवसात गारठ्यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.येत्या दोन दिवसांत कोकण वगळता विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल,
ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाचं संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे रब्बीचा हंगाम देखील हाताचा जातो की काय अशी भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे