वोडाफोन आयडियाचा एका रिचार्जमध्ये कुटुंबातील 5 सदस्यांना अनलिमिटेड इंटरनेट देण्याचा प्लान

0
90

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक उत्तम प्लान (Best Plan) आणले आहेत. परंतू असे असताना सुद्धा आपल्या वापरकर्त्यांच्या फायद्याचे अनेक प्लान घेऊन येण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. अशामध्ये कंपनीने आपला फ्लॅगशिप प्लान RedX आणि RedX Family सुरु केला आहे. या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे या प्लानचा लाभ एक व्यक्ती नाही तर कुटुंबातील एकूण पाच सदस्य घेऊ शकणार आहेत. म्हणजेच एकाच बिलामध्ये पाच लोकं हा प्लान (Voafone Idea Best Postpaid Plan) वापरु शकणार आहेत. पण ही सुविधा फक्त कंपनीच्या पोस्टपेड (Postpaid Plan) सदस्यांसाठी उपलब्ध आहे
वोडाफोन आयडिया कंपनीने आपले दोन प्रमुख प्लान सादर केले आहेत. या प्लानची किंमत 1,699 रुपये आणि 2,299 रुपये आहे. हे प्लॅन खास करून अशा वापरकर्त्यांसाठी सादर केले गेले आहेत जे वर्कफ्रॉम होम (Workfrom Home) करत आहेत. वर्कफ्रॉम असल्यामुळे अशा परिस्थितीत घरी जास्त इंटरनेट वापरला जात आहे. जर तुमच्या घरात मुलांचे ऑनलाईन क्लासेस (Online Classes)तसेच घरातून काम चालू असेल तर तुम्ही या प्लानचा वापर करु शकता. यामध्ये तुम्हाला फक्त एक बिल सादर करावे लागेल आणि एकूण पाच सदस्य ते वापरू शकतील.


वोडाफोन आयडियाच्या 2,299 रुपयांच्या या प्लानमध्ये पाच लोक एकाच वेळी सहभागी होऊ शकतात. म्हणजेच तुमच्या कुटुंबातील पाच सदस्य ही योजना वापरू शकतात. हा प्लान वापरला तर तुम्हाला वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेस किंवा मुलांच्या गेमिंगबाबत कोणतीही अडचण येणार नाही. या प्लानमध्ये सात दिवसांचा कॉम्प्लिमेंटरी इंटरनेशनल रोमिंग पॅकेजही (international roaming packages ) दिला जात आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये तुम्हाला अमेरिका (America), यूके (UK)आणि मध्य पूर्वसह 14 देशांसाठी विशेष ISD दरांचा लाभ मिळेल. एवढेच नाही तर योजनेच्या प्राथमिक सदस्यांना वर्षात 4 वेळा मोफत विश्रामगृहाची सेवा मिळू शकते. यात एका वेळेसाठी आंतरराष्ट्रीय विश्रामगृहाचाही समावेश आहे.


वोडाफोन आयडियाचा 1,699 रुपयांचा प्लान तीन सदस्य वापरू शकतात. यामध्ये तुम्हाला अमर्यादित 4G डेटा सुविधा मिळेल. एवढेच नाही तर नेटफ्लिक्स (Netflix), अ‍ॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिस्ने + हॉटस्टारसह (Disney + Hotstar) व्हीआय मूव्हीज (VI Movies) आणि टीव्हीवर व्हीआयपी एक्सेस (TV VIP Access) फ्री दिले जात आहे. अशा परिस्थितीत इंटरनेट संपल्याची चिंता न करता तुम्ही ही योजना वापरू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here