शासकीय मुलांचे निरीक्षण गृहामधील मुलाचा शोध

0
116

सिंधुदुर्ग: शासकीय मुलांचे निरीक्षण गृहामधील बालक रुपेश करकेश शासमनवर वय १७ हा निरीक्षणगृहामध्ये दाखल असताना कुलरमधील पिण्याचे पाणी आणण्याकरिता गेला असता कोणीतरी आज्ञात इसमाने त्यास फुस लावुन कायदेशीर पालकांचे सुरक्षा रक्षकांचे ताब्यातुन विनापरवानगी पळवुन नेले आहे.

मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. रा. रुम नं -१०, बाब भालचंद्र अपार्टमेंट, नागवेकर हॉस्पीटल जवळ, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग .

वर्णन रंग- काळा,उंची १६५ सेंमी, बांधा – मजबुत,अंगात काळया रंगाचा टिशर्ट, व निळया रंगाची हाफ पँट अशा वर्णनाचा आहे.

सदर बालक आढळल्यास सिंधुदुर्ग पोलिस स्टेशन -०२३६२ २२८८८८, पोलीस उप निरीक्षक, नळकांडे मोबा.९७६२९००४०३ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आर.एस.नळकांडे तपा. अंम . पोलीस उपनिरीक्षक सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here