प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
संगमेश्वर -मा ना अशोकरावजी चव्हाण मंत्री सार्वजनीक बांधकाम यांच्या आदेशाने कसबा शास्री पूल ते नायरी , शृंगारपूर , कातुर्डी ,कळबंस्ते अंत्रवली तांबेडी तसेच तिवरे ते निवळी हे रस्ते मंजूर झाले. सदर रस्ते मंजूर होण्यासाठी व काम सुरु होण्यासाठी दशक्रोशीतील सर्वच प्रमुख नेत्यांनी ऊपोषण केले होते. त्यामध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव जाधवही होते. सदर ऊपोषण मागे घेण्यासाठी ऊपअभियंता देवरुख ता. संगमेश्वरच्या इंगवले मॅडम यांनी प्रयत्न केले.
तसेच बांधकाम मंत्री यांच्या आदेशाने अधिक्षक अभियंता छाया नाईक आणि कार्यकारी अभियंता प्रभारी मुळे साहेब व सध्याच्या कार्यकारी अभियंता पुजारी मॅडम यांच्या मुळे पहिल्या अडीच कि.मी टेंडर निघाले. त्याचे भुमिपुजन रविवार दिनांक 2 / 1 / 2O22 रोजी दुपारी इंगवले मॅडम आणि कसब्यातील प्रतिष्ठीत नागरिकांचे हस्ते पार पडले. पण रस्ता दुरूस्ती आणि डांबरीकरण याचा आजवरचा अनुभव पाहता दशक्रोशीतील काँग्रेसने देखरेख कमिटी स्थापन केली आहे.
या कमिटीत कॅप्टन हनिफ खलफे , कॅप्टन बशिर ऊपाध्ये , बोरसुदकर गुरुजी , इलियास मापारी , सुनिल पवार , पांडूरंग घोरपडे ,नझीर म्हात्रे , राजू पाटील , अल्ताफ म्हात्रे , मुझ्झफर खलफे , निहाज जावळे , अश्रफ शेखदारे , इक्बाल नाना मोडक , रविंद्र नागरेकर , राजा म्हस्के , तज्जमुल पाटणकर, संतोष कुवळेकर असून प्रत्येक गावातील प्रमुख लोक काँग्रेसच्या देखरेख कमिटीत घेतले जाणार आहेत . संबधीत ठेकेदाराने शेड्युल बी ची प्रत देखरेख कमिटीला देणेची आहे व त्या प्रमाणेच देखरेख कमिटी रोजच्या रोज व्हीडीओ शुटींग करेल व कामाचा दर्जा ठरवेल असे काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे .