शिवसेना पोईप विभागाचा आदर्श संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक घेतील- आ. वैभव नाईक

0
81

पोईप-विरण शिवसेना संघटनेच्या रुग्णवाहिकेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

पोईप विरण येथील शिवसैनिकांनी रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी स्वखर्चाने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. बाळासाहेबांना अपेक्षित असे काम शिवसैनिक करत आहेत. हा उपक्रम आदर्शवत असून शिवसेना पोईप विभागाचा आदर्श संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक घेतील असे आमदार वैभव नाईक यांनी सांगत शिवसैनिकांचे कौतुक केले. यापुढेही लोकसेवेचा व पक्षवाढीचा वेग असाच कायम सुरू ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. आपण आमदार या नात्याने सदैव तुमच्या सोबत असून तुम्ही केलेल्या उपक्रमात आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आ.वैभव नाईक यांनी दिली.

पोईप-विरण शिवसेना संघटना व आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यातून पोईप विभागातील रुग्णांच्या सेवेसाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. रविवारी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी जिप सदस्य संग्राम प्रभुगावकर, मंदार केणी, विभागप्रमुख विजय पालव, गोपीनाथ पालव, पंकज वर्दम, सुरेश नेरूरकर, भाऊ चव्हाण, नंदू गावडे, अमित भोगले, दाजी मसदेकर, सत्यवान पालव, पराग नार्वेकर, किरण प्रभू, सुभाष धुरी, नाना नेरूरकर, आशिष परब, विजय पालव, दीपक मसदेकर, कृष्णा पाटकर, बबन परब, अमित परब, दिनेश परब, चंद्रकांत बागवे, मसदे ग्रा. प सदस्य ऋतुजा नार्वेकर, केतकी प्रभू, सुरेश नेरुरकर,नाना परब, डॉ.खोत,डॉ.मेहेंदळे, डॉ.परब,डॉ.नांदोडकर, अनंत पालव व पोईप विभागातील शिवसेना शाखाप्रमुख, सरपंच, अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी संग्राम प्रभुगावकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, मंदार केणी यांनी मनोगत व्यक्त केले.पोईप विभागातील जनतेची रुग्णवाहिके अभावी होणारी गैरसोय दुर करण्यासाठी मसदे विरण येथील किरण प्रभू, पराग नार्वेकर, नाना नेरूरकर, सुरेश नेरूरकर व सहकाऱ्यांच्या सहकार्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाली. याबाबत त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

दरम्यान यावेळी कोरोना संकटात उत्तम रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वायरमन, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विभागातील दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here