केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मागील वर्षी संसदेत तीन कृषी कायदे लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला होता.शेतकरी आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
किसान यूनियनचे वरिष्ठ नेते युद्धवीर सिंह यांच्यासोबत अमित शहा यांचे आज फोनवर बोलणे झाले. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी केंद्र सरकार सहमत असल्याचे समजते.