प्रतिनिधी पांडुशेठ साठम
निस्सीम श्री स्वामी भक्त, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे देणगीदार गेली पन्नास वर्षे अमेरिकेत न्यु जर्सी येथे स्थायिक झालेले सन्माननीय आदरणीय श्री.माधव शशिकांत भाटकी हे सात्यत्याने श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील बांधकाम निधीसाठी देणगी पाठवून देत असतात.तसेच त्यांच्या शीष्य परीवारातील सभासद सुधा देवगड हडपीड मठाच्या बांधकाम निधीसाठी देणगी देत असतात.गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात श्री.माधव भाटकी साहेब देणगी पाठवून देत आहेत.त्यामुळे मठाच्या उर्वरित बांधकाम निधीसाठी खुप खुप मोठे सहकार्य आम्हाला मिळत आहे
.
श्री माधव शशिकांत भाटकी यांचे शिष्य सन्माननीय श्री कृष्णा व सौ.सुकन्या कृष्णा यांनी मठाच्या परिसारातील सोलर दिव्यांसाठी ४३०००/- त्रेचाळीस हजार रुपये देणगी पाठवून दिली आहे.ह्या आधी सुधा त्या उभयतांनी मठासाठी देणगी दिली आहे.श्री स्वामी समर्थ महाराज आपनास व आपल्या परीवारास सदैव सुखी आनंदी निरोगी ठेवो असे मठाचे संस्थापक विश्वस्त श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.