सावंतवाडी येथील हाँटेल उद्योजक नरेंद्र भालेकर यांचे निधन!

0
76


सिंधुदुर्ग- अभिमन्यु वेंगुर्लेकर


सावंतवाडी येथील प्रसिद्ध हाँटेल उद्योजक भालेकर खानावळ तथा महालक्ष्मी भोजनालयाचे मालक राजू भालेकर यांचे थोरले बंधू नरेंद्र गजानन भालेकर यांचे आज साय.७-३० वाजणेच्या सुमारास कीडणीच्या आजाराने निधन झाले मागील काही दिवस ते आजारी होते.

सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचा नावलौकीक होता तर काही काळ राज्य परिवहन मंडळात ते चालक म्हणून काम करीत होते त्यांनी पत्रादेवी महामार्गावर आपले भालेकर खानावळ यांची दुसरी शाखा म्हणून महालक्ष्मी भोजनालय सुरु केले होते सावंतवाडी व परिसरात ते लोकप्रिय होते शिवसेनेत त्यांनी निष्ठांवंत शिवसैनिक म्हणून काम केले होते मिनमिळावू मित्र म्हणून त्यांचा सावंतवाडीत व तालुक्यात मोठा मित्रपरिवार आहे.

भालेकर खानावळचे मालक राजू भालेकर यांचे ते भाऊ तर सामाजिक कार्यकर्ते तथा परिट समाज जिल्हा अध्यक्ष दिलीप भालेकर प्रदिप भालेकर यांचे संख्ये चूलत भाऊ नगरसेविका सौ.दिपाली भालेकर दिलीप यांचे चूलत दिर असलेल्या नरु भालेकर या नावाने ओळख असलेल्या नरेंद्र भालेकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे उद्या ११-०० वा.त्यांचा अंत्यविधी होणार असून अन्येक मान्यवरांनी त्यांच्या नातेवाईकांचे सात्वन केले आहे पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ राजू, जाऊ, आई, दोन बहीणी , असा मोठा भालेकर परिवार आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांचे घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले आमचे अतिशय जवळचे मित्र नरु भालेकर आमचेतून निघून गेल्याचे मनस्वी दुखंः आणि असह्य वेदना मनाला होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here