सार्वजनिक बांधकांम विभागाचा मनमानी कारभार
सिंधुदुर्ग – अभिमन्यु वेंगुर्लेकर
दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे जिल्हा प्रतिनीधी यांना आंदुर्ले गावचा रस्ता दीड महीन्यात डांबरीकरण करणार अस आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे तरी ते या आश्वासनावर खरे उतरतील अशी आशा आहे.
त्यांनी दिलेल्या माहीती नुसार आंदुर्ले खिंड ते केळुस रस्त्यासाठी निधी मंजूर करूनही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी तो निधी रेती डंपर वाहतूकीसाठी वालावल ते हुमरमळा येथे खर्ची करीत आहेत असे समजते, तसेच सदर बनत असलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे शिवाय हा आमदारानी मंजूर केलेला निधी हा खिंड ते केळूस यासाठीच आहे अस असतानाही सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी असे का केले असे सिंधुदुर्ग समाचारच्या प्रतिनिधीनी आमदाराना विचारणा केली असता त्यानी दीड महीन्यात रस्ता स्वःता लक्ष देवुन आंदुर्ले वासियांची समस्या सोडवेन असे आश्वासन दिले आहे.