सिंधुदुर्ग: दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांनी आपल्या हयातीचे दाखले 10 जानेवारी 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. सिंधुदर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले हयात असल्याचे दाखले घेऊन त्यावर स्वतःचा एक फोटा लावावा.तसेच असे आपले दाखले ग्रामसेवक नगरसेवक अथवा बँकेकडून स्वाक्षरी घेवून सोबत या कार्यालयाने दिलेल्या ओळखपत्राचे प्रत, आधारकार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे जमा करावे .
जे लाभार्थी दुर्गम भागात राहतात अशा लाभार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी. तसेच जे लाभार्थी मयत झालेले आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले त्यांच्या वारसदारानी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत कि जेणे करुन त्यांचे पुढील अनुदान कायमस्वरुपी बंद करण्यात येईल. लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले 10 जानेवारी पर्यंत जमा न केल्यास अशा लाभार्थीचे अनुदान बंद करण्यात येईल. त्यामुळे हयातीचे दाखले वेळेत सादर न केल्या मुळे आपले अनुदान बंद झाल्यास तुम्ही स्वत: जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी