सिंधुदुर्ग: जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 30 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजन

0
104

सिंधुदुर्ग: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सूचनेनुसार 15 ते 29 वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गुरुवार दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय एकात्मता व युवाच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, सुप्त कलांचे सादरीकरण होण्यासाठी करण्यात येते. यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा, विभाग,राज्य, राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या युवा महोत्सवाकरिता पुढील कला प्रकार आहेत. लोक नृत्य folk dance सहभाग कलाकार संख्या 20, वेळ 15 मिनिटे ठेवण्यात आलेली आहे. तसेच लोकगीत folk dance सहभाग कलाकार संख्या 10, वेळ 07 मिनिटे ठेवण्यात आलेली आहे. जिल्हयातील महाविद्यालयातील शिक्षण घेणारे शिक्ष्‍ाण पूर्ण झालेले, कला अध्यापन, विद्यार्थी, नाट्य मंडळातील कलाकार या सर्वासाठी हा कलामंच खुले आहे.

या महोत्सवातील कला प्रकारासाठी प्रवेश विनामुल्य असून प्रविण्य संपादन करणारे कलाकारांना शासनाचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी आपला प्रवेश निश्चित दिनांक 28 डिसेंबर 2021 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग ठिकाणी प्रवेश अर्ज सादर करुन निश्चित करण्यात यावा. प्रवेश अर्ज प्राप्त होताच ऑनलाईन लिंक कळविण्यात येईल. तरी जिल्ह्यातील युवा महोत्सवाचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विजय शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here