सिंधुदुर्ग: जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला व बाल विकास विभाग केंद्र शासन पुरस्कृत ‘सखी वन स्टॉप सेंटर’ कार्यान्वीत

0
70

सिंधुदुर्ग

हिंसाग्रस्त महिलेला एका छताखाली समुपदेशन, कायदेविषयक, वैद्यकीय, पोलीस यंत्रणाविषयक, वास्तव (आधार) प्रकारच्या सेवा तात्काळ आवश्यकते प्रमाणे उपलब्ध करुन देण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला व बाल विकास विभाग केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वीत आहे. पीडित महिलांनी 181, 02362-229039 या वर संपर्क करावा. त्यांना मदत दिली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

26 जानेवारी 2018 रोजी तात्पुर्त्या स्वरुपात केंद्र सरकारच्या तत्कालीन निर्देशानुसार व महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या सूचनेप्रमाणे वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले. 15 जुलै 2020 पासून कामकाजाला सुरुवात झाली. खासगी, सार्वजनिक, कार्यालयीन, सांस्कृतिक ( पारंपरिक ) अशा कोणत्याही स्तरावरील क्षेत्रात हिंसेला बळी पडलेल्या महिलेला आधार पुरवुन महिलेला तिच्यावर होणाऱ्या हिंसेविरोधात दिलासा मिळवून देणयाच्या दृष्टीने कार्यवाही या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून करण्यात येते.

मानसिक आधार किंवा समुपदेशन, निवासाची तात्पुर्ती सोय, कायदेविषयक मार्गदर्शन, पोलीस ठाणे संबंधीत सेवांची माहिती, वैद्यकीय सेवा, मनोसमाजिक समुपदेशन, तात्काळ मदत व सुटके संदर्भात कारवाई अशा सेवा दिल्या जातात. हिंसाचार झालेल्या महिलांना या केंद्रामार्फत तात्काळ दिलासा देण्याचे काम केले जाते. यात सर्व प्रकारच्या महिलांवरील हिंसांचा समावेश आहे. हिंसाग्रस्त महिलांना तात्पुर्त्या स्वरुपाची निवास व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाते.

सर्व वयोगटातील मुली व 8 वर्षे वयापर्यंतचा मुलगा जास्तीत जास्त 5 दिवसापर्यंत याठिकाणी तात्पुर्त्या निवासाची सोय उपलब्ध करून दिली जाते. पीडित महिलांनी आपल्या वरील हिंसेविरोधात या केंद्राशी संपर्क साधावा, असे ही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे – कौटुंबिक हिंसाचार, हुंडा विषयक, अनैतिक व्यापार, पोक्सो, बाल विवाह, सायबर क्राईम अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यातील पीडित महिलांना वन स्टॉप सेंटर या एकाच छताखाली एकाच ठिकाणी मोफत कायदेशीर सल्ला, पोलीस सेवा, निवाऱ्याची सोय दिली जाते. 24 तास दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. पीडित व्यक्तींनी या सेंटरचा लाभ घ्यावा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ – हे सेंटर 24 तास सुरू असते. सामाजिक व वैद्यकीय सेवा रात्री अपरात्री या केंद्राच्या माध्यमातून दिल्या जातात. समाजातील पीडित हिंसाग्रस्त महिलांना हे सेंटर आधार देण्याचे काम करते.

ओरोसमधील या सेंटरमधून आज अखेर 157 महिला व 1 बालकाला सुविधा देण्यात आली आहे. आसाम, गोवा येथील महिलांना या केंद्रा मार्फत सुरक्षित पोहच करण्यात आले आहे. केंद्रा मार्फत संबंधित महिलांचा गृह भेटी करुन पाठपुरावा केला जातो, अशी माहिती केंद्राच्या प्रशासक ॲड्. पूजा काजरेकर यांनी दिली. या केंद्राची कार्यप्रणाली पाहता निश्चितच पीडित, हिंसाचारग्रस्त महिलांसाठी हे सेंटर खऱ्या अर्थाने त्यांची ‘सखी’ असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here