सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदावर सोमनाथ रसाळ यांची नियुक्ती

0
126

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदावर सोमनाथ रसाळ आज रुजू झाले. यापूर्वी त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद येथे कामकाज केले आहे. त्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणूनही काही महिने कार्यभार सांभाळला आहे. सर्वांनी मिळून जिल्ह्यातील वंचीत, पीडित महिला व बालकांसाठी काम करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यालयातील उपस्थितांना केले.

यावेळी प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा पर्यावेक्षण अधिकारी बी.जी.काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक पुजा काजरेकर, समुपदेशक रुपाली प्रभू, कार्यालयातील कर्मचारी संजय पवार, संगीता माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here