सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी , यासाठी आजपासून ७ सप्टेंबर रोजी २४ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७(१) (३) नुसार मनाई आदेश लागू केल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.
पोलीस अधीक्षकांनी निदर्शनास आणल्यानुसार सद्यस्थितीत राज्यात वेगवेगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजकीय हेवेदाव्यास्तव आमने सामने येवून आंदोलने करीत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
विविध समाजाच्या आरक्षणावरुन विविध संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना त्यांच्या अषालेल्या मागण्यांच्या संबंधाने न्याय मिळवून घेण्याकरिता आक्रमक झालेल्या असून त्यांच्याकडूनही आंदोलने, निदर्शने होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न नाकारता येत नाही.
पेट्रोल, डिझेल , गॕस दरवाढ व इतर कारणावरुन राजकीय पक्षाकडून टीका टिपणी केली जात आहे.या कारणावरुन राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलने, निदर्शने होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७(१) (अ) ते (फ) आणि ३७ (३) प्रमाणे आज सायंकाळी ६ पासून ७ सप्टेंबर रोजी २४ वाजेपर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती केली आहे.त्यानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मनाई आदेश दिला