सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन १५ उपअभियंत्यांची नियुक्ती

0
54


प्रतिनिधी- अभिमन्यु वेंगुरर्लेकर


ना.उदय सामंत, खा.विनायक राऊत,आ.दीपक केसरकर,आ.वैभव नाईक यांचा पाठपुरावा

पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त असलेली उपअभियंता पदे भरण्यात आली आहेत.सिंधुदुर्ग मधील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पतन विभाग, मार्गप्रकल्प विभाग या विभागांमध्ये एकूण १५ अभियंत्यांना उपअभियंता म्हणून नवनियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्त्या झाल्याने विकास कामांची कार्यवाही गतिमान पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळसाठी राजन वामन चव्हाण, सावंतवाडीसाठी सिमा यशवंत गोवेकर, वेंगुर्लेसाठी शंशाक भगत, दोडामार्गसाठी अनिल बडे, वैभववाडीसाठी विनायक जोशी, कणकवलीसाठी गणेश कर्वे, देवगडसाठी श्रीनिवास बासुतकर,

जिल्हा परिपषद सिंधुदुर्ग मध्ये कुडाळसाठी राजेंद्र कुलांगे, मालवणसाठी संतोष सावर्डेकर, ओरोससाठी धनंजय ठाकरे, देवगडसाठी नरेंद पं. महाले,
पतन विभागात कुडाळ (ओरास) साठी महादेव चव्हाण, देवगड (वाघोटन)साठी प्रशांत पवार, तर मार्गप्रकल्प विभागात कणकवलीसाठी विनोद दिवटे, कुडाळसाठी राजेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here