सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसी एकूण 27 हजार 150

0
141

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 29 हजार 44 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 673 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 264 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

तसेच 60 वर्षावरील 98 हजार 685 व्यक्तींनी पहिला डोस तर 57 हजार 421 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 5 हजार 915 नागरिकांनी पहिला डोस तर 55 हजार 112 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 4 हजार 699 जणांनी पहिला डोस तर 13 हजार 577 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 4 लाख 70 हजार 91 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 4 लाख 64 हजार 800 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 3 लाख 38 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 26 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 3 लाख 43 हजार 824 कोविशिल्ड आणि 1 लाख 26 हजार 267 कोवॅक्सिन असे मिळून 4 लाख 70 हजार 91 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 27 हजार 150 लसी उपलब्ध असून त्यापैकी 24 हजार 70 कोविशिल्डच्या आणि 3 हजार 80 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 530 लसी शिल्लक असून त्यापैकी 270 कोविशिल्ड आणि 260 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here