सिंधुदुर्ग-भांबेड ह. भ. प. सोनू बाबा कुर्णेकर यांची पुण्यतिथी व समाधी सोहळा कार्यक्रम संपन्न

0
49

प्रतिनिधी- राहूल वर्दे

सिंधुदुर्ग लांजा – “कीर्तनाच्या माध्यमातून वर्षोनुवर्षे आपली संस्कृती जोपासण्याचे आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर ते वारकरी सांप्रदायाने केले” असल्याचे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी येथे काढले.भांबेड येथे ह. भ. प. सोनू बाबा कुर्णेकर यांच्या पुण्यतिथी सोहळा व समाधी सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राला घडविण्याचे काम सातत्याने वारकरी सांप्रदायाने केले आहे. त्यामुळे अशा पवित्र कार्यक्रमासाठी निमंत्रीत केलेत त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. अशा शब्दात राणे यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

आजची तरूण पिढी कोणावर विश्वास ठेवते माहित नाही. परंतु कशावर तरी आणि कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे ही शिकवण वारकरी संप्रदाय आजवर देत आला आहे. त्यातूनच आजवरची पिढी घडत गेली. तुमच्या विचारांनी महाराष्ट्र चालला, देश चालला, जगही चालला तर दुसरं काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही जी शिकवण देता ती अख्या महाराष्ट्राला पुरेशी आहे असे उद्गगार राणे यांनी काढले.

मागच्या दोन वर्षापासून कोरोना संकट काळ आहे. देवालये बंद, दर्शन नाही. यात्रा नाही. पंढरपुरच्या यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविकांचे फोन येत होते. इच्छा असूनही दर्शनाला जाता येत नव्हते. पण आज उशीरा का होईना विठ्ठलाच्या कृपेने दर्शनांसाठी देवांची देवालये उघडली आहेत. आपण सर्वजण पुन्हा एकदा हरिनामसंकिर्तनात रंगलात. ही चांगली गोष्ट झाली.

आपण कीर्तनाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जी संस्कृती जोपासलेली आहे. ती आम्ही ऐकली, बघीतली. हीच पिढयानपिढया चालत राहोत. आमच्या नंतरच्या संगळया पिढयांना त्याचे दर्शन घडो, यासाठी आपला संप्रदाय जे काम करतोय, जी वाटचाल करतोय त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी आलो. आपला एक हक्काचा माणूस म्हणून नेहमी सोबत आहे हे सांगण्यासाठी मी आज आलो. कधीही कसलीही गरज पडेल तर तुम्ही हाक मारा त्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द यावेळी राणे यांनी वारकरी सांप्रदायला दिला.

आजवर अनेक संकटे आली. संकटे येतात जातात. महाराष्ट्रावरही संकट आले. हे आपण सर्वानीच जवळच्या काळामध्ये बघीतलेले पण आहे. परंतु संकट काळामध्येही खचून जाता पिढीला दिशा दाखविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. तुम्ही जी शिकवण देता ती अख्या महाराष्ट्राला पुरेशी आहे. आपले असेच पवित्र काम, महाराष्ट्राला घडविण्याचे काम, दिशा देण्याचे काम आपण सातत्याने चालू ठेवावं येवढंच या निमित्ताने सांगेन असे राणे म्हणाले. सांप्रदायाने केलेल्या यथोचित सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वारकरी सांप्रदायाचे वतीने निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

तुमची काळजी आम्हाला आहे..

कार्यक्रमस्थळी येताना अत्यंत खडतर रस्त्यातून वाटचाल करत यावे लागले. त्यामुळे मला त्रास झाला तरी चालेल परंतु तो तुम्हाला होता नये यासाठीची काळजी आपण घेवू असा शब्द राणे यांनी यावेळी उपस्थिताना दिला. तर पारी वारी जाताना डोंगराचे घाट रस्त्यात रूपांतर व्हावे या मागणीची दखल घेत ते काम तुंम्ही माझ्यावर सोडा, मी करून देतो असे आश्वासन निलेश राणे यांनी यवेळी दिले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, महिला आघाडी नेत्या उल्का विश्वासराव, भाजपाचे दीपक बेंद्रे, लांजाचे नगरसेवक संजय यादव, बाबा लांजेकर, नंदू चव्हाण, कोकण जनकल्पाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, अरवींद लांजेकर आदींसह भांबेड व लांजा भागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी ह. भ. प. सोनू बाबा कुर्णेकर यांचे वंशज संतोष महाराज कुर्णेकर, प्रमोद गुरव, नरेंद्र बुआ राणे बोरथडे, प्रमोद गुरव आदींसह वारकरी सांप्रदायाचे सर्व वारकरी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.भांबेड येथे वारकरी सांप्रदाराच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार करताना वारकरी बांधव याप्रसंगी रवींद्र नागरेकर, उल्का विश्वासराव, मुन्ना खामकर आदी. तर दुसऱ्या छायाचित्रात मनोगत व्यक्त करताना निलेश राणे. तर तिसऱ्या छायाचित्रात ह. भ. प. सोनूबाबा कुर्णेकर यांच्या समाधीचे दर्शन घेतना निलेश राणे, रवींद्र नागरेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here