प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग-
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत” कला उत्सवाचे “दरवर्षी आयोजन करण्यात येते .या कला उत्सव 2021 अंतर्गत जिल्हास्तर ,राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धेत ‘खेळणी बनवणे ‘या कलाप्रकारात वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, तालुका मालवण ची विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा नीळकंठ मेस्त्री हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धेतही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिची निवड राष्ट्रीय पातळीवर ‘कला उत्सव’ ,स्पर्धेसाठी झाली आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत. याच खेळण्याची मातीतील प्रतिकृती प्रतिक्षा हिने या स्पर्धेत सादर केली. तिला प्रशालेचे कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी.विद्यार्थिनीचे,पालकांचे ,मार्गदर्शक शिक्षकांचे.संस्था विश्वस्त ऍड. एस.एस. पवार, डाॅ.व्ही .सी वराडकर,अध्यक्ष श्री अजयराज वराडकर ,उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर,श्री. प्रशांत टेंबूलकर सचिव श्री.सुनिल नाईक,श्रीमती विजयश्री देसाई ,सहसचिव मंदार वराडकर, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर सर्व संचालक वर्ग , शालेय समिती अध्यक्ष श्री .सुधिर वराडकर मुख्याध्यापक श्री. एन. के. कांबळे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले. .