राजकीय घडामोडीनंतर जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली होती. पण, हीच यात्रा आता रत्नागिरीमधून 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मोठ्या धुमधडाक्यात ही यात्रा मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू होईल अशी माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.00 वाजता जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळकडे प्रयाण.
सकाळी 10.00 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व रत्नागिरी शहर, हातखंबा, पाली, लांजा, राजापूर, खारेपाटण, कणकवली शहर, कणकवली येथे होणाऱ्या नागरी कार्यक्रमांना उपस्थिती व कणकवली येथे मुक्काम.