बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे पती आणि माजी क्रिकेटियर मन्सूर अली खान यांचा 22 सप्टेंबर रोजी 10 व्या स्मृतीदिन होता. यावेळी शर्मिला टागोर आणि मुलगी सोहा अली खान, सोहाची मुलगी सबा यांनी टायगर यांना आदरांजली वाहिली. मन्सूर अली यांची कबर पतौडी हवेलीत आहे.
सोहाने हे फोटो शेअर करताना एक भावूक नोट लिहिली आहे.’अब्बा, मला दररोज तुमची आठवण येते. मला माहिती आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मला बघत आहात. तुम्हाला जाऊन दहा वर्ष झाली असे वाटते ही नाही. तुम्ही कायम आमच्या मनात, हृदयात असणार आहात..तुमच्यावर कायम प्रेम करत राहू…’असे तिने त्यात लिहिले आहे.मन्सूर अली खान पतौडी यांचे 2011 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज देताना निधन झाले