सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ‘हवाहवाई’ या मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा आपला आवाज दिला आहे. या चित्रपटाचे दिग्ददर्शन महेश टिळेकर यांनी केले आहे. या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने वयाच्या 88 व्या वर्षी आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. बऱ्याच वर्षांनी आशाताईंनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायल्यानं स्वाभाविकपणे या गाण्याविषयी आणि महेश टिळेकर दिग्दर्शित “हवाहवाई” चित्रपटाविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे