आता पुन्हा एकदा सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून येणार?; नव्या सरकारकडून लवकरच घोषणेची शक्यता

0
160
Maharashtra: राज्यातील ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान 
Maharashtra: राज्यातील ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान 

मुंबई- आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि सरंपच यांची निवड थेट जनतेमधून होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने याला स्थगिती देत पूर्वीची पद्धत पुन्हा लागू केली होती. ज्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडला जायचा मात्र आता नवे सरकार सत्तेत येताच हा नियम बदलण्याची शक्यता आहे. आता थेट सरपंच आणि नागराध्यक्षांची निवड ही जनतेमधून होऊ शकते. याबाबत भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.

नगराध्यक्ष जनतेमधून न निवडता सदस्यांमधून निवडला गेल्यास मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचाराला वाव असतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अस्थिर बनतात. त्यामुळे नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेमधूनच व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here