कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रमचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. घरातील सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एक सरप्राईझ मिळाले बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री झाली. सगळ्यांचा लाडका आदिश वैद्य वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरामध्ये जााणार आहे.आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल ? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल ? घरातील नाती त्याच्या एंट्रीमुळे बदलणार का ? कोणत्या गृपचा आदिश सदस्य होणार ? कि तो त्याचा गृप तयार करणार ? कि स्वत:चा खेळ स्वतंत्रपणे खेळणार ? हे बघणे रंजक असणार आहे.