वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
खानोली गावचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सुत्रसंचालनातुन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन संपन्न झालेल्या शिर्डी येथील वैचारिक संमेलन व गुणगौरव कार्यक्रमात शिर्डीवासियांसह महाराष्ट्रातील अनेक श्रोत्यांची मने जिंकत सिंधुदुर्गाची शान वाढवली आहे.
शिर्डी येथील साई वात्सल्य संस्थेच्या वर्धापनदिना निमित्ताने साई संस्थानच्या प्रशस्त नाट्यगृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सिने अभिनेता दिगंबर नाईक हे ही प्रा.वैभव खानोलकर यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने भारावून गेले व आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात खानोलकर यांच्या सुत्रसंचालनाचे कौतुक करत शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून त्यांनी यापूर्वी डॉ.प्रकाश आमटे,
पद्मश्री सिंधुताई सपकाळ, सिनेतारका वर्षा उसगावकर, निवेदिका समिरा गुजर, आमदार निलेश राणे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, गोव्याचे कामगार नेते अॅड.राणे, खासदार संजय राऊत, अभिनेता माधव अभ्यंकर, अरुण नलावडे, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविद तावडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, समाजसेविका तृप्ती देसाईसह अॅड.प्रकाश आंबेडकर, अभिनेत्री किशोरी आंबिये यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाचे अभ्यासपुर्ण निवेदन करताना यांच्याही मनाचा वेध घेत शाबसकी मिळवली.
निवेदनातून राज्यस्तरावर सिंधुदुर्गाचे नाव झळकवणा-या ‘द व्हाईस ऑफ सिंधुदुर्ग‘ म्हणून निवेदनाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणा-या प्रा.खानोलकर यांचे राज्यस्तरातुन कौतुक केले जात आहे.
फोटोओळी – अभ्यासपूर्ण निवेदनाबद्दल प्रा.वैभव खानोलकर यांचा अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


