कुडाळ/प्रतिनिधी
आंदुर्ले ग्रामपंचायतच्या सभागृहात मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, कुडाळ सन्मा. श्री. अमोल पाठक यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी व्यासपिठावर आंदुर्ले सरपंच सन्मा. सौ. पूजा सर्वेकर, उपसरपंच श्री. ज्ञानेश्वर तांडेल, सुवर्णमहोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण पाटील (आबा पाटील), संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री. अतुल बंगे, कुडाळ पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. नारायण परब, कृषी अधिकारी श्री. प्रफुल्ल वालावलकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. संजय ओरोसकर, श्री. आर.डी. जंगले साहेब उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4 जुलै 2022 रोजी ग्रामपंचायतला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज मा. तहसिलदार यांच्या हस्ते उपकेंद्र आंदुर्ले येथील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, मदतनीस यांच्या आरोग्यविषयक कार्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मापत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संतोष पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सन्मा. सरपंच यांनी केले. सन्मा. तहसिलदार, सन्मा. सहाय्यक गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, श्री. आबा पाटील, श्री. अतुल बंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


