सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 157 मिमी तर एकूण 1413 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 157 मिमी तर एकूण 1413 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
🚨 रेड अलर्ट जारी
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 05 जुलै 09 जुलै 2022 रोजी या कालावधीसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पाच दिवसात दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी. ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


