सिंधुदुर्ग/प्रतिनिधी-अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रतिवर्षी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा निहाय नियतव्यय कळवून जिल्ह्याच्या आराखड्याचे प्रारूप तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांना देण्यात येतात. जिल्हाधिकारी आराखड्याचे प्रारूप तयार करून जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करतात. या आराखड्यात कोणत्या जिल्हास्तरीय योजनांसाठी किती निधी ठेवावा याबाबत जिल्हा नियोजन समितीने घेत असतात.
सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती यांच्या नावाने नित्या नजीकच्या काळात होणे अपेक्षित असून जिल्हा नियोजन समितीच्या नवीन नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यासह जिल्हा नियोजन समितीचेही पुनर्गठन होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती रचना व कामे अधिनियम 1998 च्या कलम 12 मधील तरतुदीनुसार राज्य शासनास प्राप्त अधिकाऱ्यांनव्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सण 2022-23 अंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2022 पासून आजतागायत विविध योजना अंतर्गत कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात येत आहे तसेच नवीन पालकमंत्री महोदयांच्या नियुक्त झाल्यानंतर सदर प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांची यादी पालकमंत्री महोदयाच्या पुनर्विलोकनार्थ सादर करून ती कामे पुढे चालू ठेवावीत किंवा कसे याबाबत नवनियुक्त पालकमंत्री महोदयाच्या सहमतीने निर्णय घेण्यात यावा. असे परिपत्रक प्राप्त झालेले आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022 23 अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याबाबत सूचना राज्यशासन कडून देण्यात आल्या आहेत.


