युवक व युवकतींच्या सर्जनशिलतेस वाव मिळून जिल्ह्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करुन त्याद्वारे ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने सन 2019-20 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबवण्यात येत आहे.
योजनेच्या पात्रता अटी पुढीलप्रमाणे आहेत. राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान 18 ते 45 वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे उमेदवार, विशेष प्रवर्गासाठी ( अनुसुचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक) 5 वर्षांची अट शिथील, 10 लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी शिक्षणाची अट नाही. तसेच 10 लाख रुपयांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व 25 लाख रुपयांवरील प्रकल्पांसाठी किमान 10 वी पास. अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या, महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
प्रकल्प मर्यादा किंमत – प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल 50 लाख रुपये व सेवा, कृषी व पूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल 10 लाख रुपये. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाई पद्धतीने अंमलबजावणी होईल, यासाठी विशेष पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. संकेतस्थळावर पात्र अर्जदारांचे अर्ज करणेसाठी जिल्हा उद्योग कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
पात्र उमेदवारांनी जिल्हा उद्योग केंद्र, दूरध्वनी 02362-228705 येथे संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.


