सिंधुदुर्ग : वेंगुर्ल्यातील मनोहर आडेलकर यांचा चिरेखाणीच्या पाण्यात आढळला मृतदेह

0
115
मनोहर आडेलकर

वेंगुर्ला प्रतिनिधी-सुरेश कोलगेकर

वेंगुर्लाशहरातील कॅम्प रामघाट रोड येथील रहिवासी मनोहर उर्फ बाळू परशुराम आडेलकर (५८) यांच्या मृतदेह येथीलच त्यांच्या घराच्या मागे असलेल्या बंद चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात आढळुन आला. याबाबत वेंगुर्ला पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

      याबाबत मनोहर आडेलकर यांचे भाऊ उमेश उर्फ बबलू आडेलकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे कीरविवारी ३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून आपला भाऊ घरी आला नसल्याने त्याच्या पत्नीने सांगितले. यावेळी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेच आढळून आला नाही. दरम्यान मनोहर यांचे टॉवेल हे घराच्या मागे असलेल्या बंद चिरेखाणीच्या ठिकाणी आढळून आले. यावेकी अधिक शोधाशोध केली असता  ४ जुलै रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह बंद चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात आढळून आला. यामुळे आपला भाऊ हा या पाण्यात तोल जाऊन पडून बुडल्याने मयत झाला असल्याची माहिती बबलू आडेलकर यांनी दिली आहे.

      दरम्यान चिरेखाण येथील पाण्यात सोमवार दुपारपासून शोधकार्य सुरू केले असता मालवण येथील आपत्कालीन ग्रुपला हा मृतदेह सायंकाळी आढळून आला. या शोधकार्यात ओम शिव मोरेश्वर आपत्कालीन ग्रुप मालवणचे वैभव खोबरेकरयोगेश मुळेकरसंतोष मुळेकरकल्पेश वेंगुर्लेकरअक्षय मराळचेतन मुळेकरनितेश पराडकरमोंडकरगणेश पाडगावकरवैभव खोबरेकरमहेश शिंदेशुभम मेस्त्री आदी सहभागी झाले होते. सकाळपासून घटनास्थळी शिवसेनेचे संजय गावडेपरबवाडा उपसरपंच हेमंत गावडेसामाजिक कार्यकर्ते मारुती दोडशनट्टीसंजय परबजयेश परबभूषण अंगाचेकरविलसेन्ट डिसोजा यांच्यासाहित स्थानिक ग्रामस्थांनी शोधकार्यात मदत केली.

      घटनास्थळी पोलीस निरीक्षक अतुल जाधवपोलीस सुरेश पाटीलसखाराम परबगजेंद्र भिसेदीपा धुरी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

फोटो – मनोहर आडेलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here