इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डर्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सी एस आर च्या माध्यमातून मदत
संजय भाईप (सावंतवाडी)
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील अनेक गावांत मोफत शिलाई प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहे.त्याचा पुढील भाग महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणे हे असून त्यासाठी या महिलांना ३ वेगवेगळ्या प्रकारे उत्पनाचे साधन निर्माण करून देण्याचा मानस संस्थेचा होता. त्यासंदर्भात आय एस एस कंपनीला मदतीचे आवाहन केले होते.
काल वाशिंद येथे कोकण संस्थेच्या वतीने आय एस एस या कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कुलचे उद्घाटन करण्यात आले.या स्कुलच्या माध्यमातून ५० महिलांना रोजगार प्रशिक्षण,प्रत्येकी शिलाई मशीन, ३ प्रकारचे रोजगार निर्मिती प्रशिक्षण, साधन आणि पुढील १वर्ष व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून कमीतकमी २५ गावात शिलाई स्कुल सुरू करण्यात येणार असून या महिलांच्या स्वतःच्या गावात व्यवसाय निर्मितीचे साधन उपलब्ध होणार आहे.
काल या स्कुलची सुरुवात सर्व महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली, कोकण संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रीती पांगे यांनी जमलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या व्यवस्थापक तारा सांगळे यांनी तर आभार प्रशालेचे शिक्षिका स्नेहल मोरे यांनी मानले.


