दोडामार्ग / सुमित दळवी
कोरोना सारख्या महामारीत जीवाची पर्वा न करता कसई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांनी मोठी कामगिरी बजावली होती,आणि आजही त्याच्या कामात तोच प्रामाणिक पणा दिसून येतो.म्हणूनच या कर्मचाऱ्यांना पावसात काम करताना अडचणी येऊ नयेत यासाठी “पावसाळी सुरक्षा कवच” नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, महिला बाल कल्याण सभापती ज्योती जाधव उपस्थित होत्या.
कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा कवचात गम बूट, मास्क, हातमोजे, रेनकोट आदी वस्तू समाविष्ट असून पावसाळ्यात या गोष्टीपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा होणार आहे, कर्मचाऱ्याचें आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी वाटप करण्यात आल्याचे यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले आहे.


