75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद

0
54

’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भार’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’तावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. 

भारताच्या खेळांचा सन्मान, भारताच्या तरुण पिढीचा सन्मान, भारताचा गौरव करणाऱ्या युवकांचा सन्मान, कोट्यावधी देशवासी आज देशाच्या तरुणांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान करत आहेत. विशेषतः खेळाडूंवर आपण अभिमान बाळगू शकतो की त्यांनी केवळ मने जिंकली नाहीत, तर त्यांनी भारताच्या तरुण पिढीला आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचे मोठे काम केले आहे. युवा पिढीचे खेळाडू आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला गौरव मिळवून देणारे आपले खेळाडू या कार्यक्रमात उपस्थित आहेत. मला देशवासीयांना आणि भारताच्या कानाकोपऱ्यात उपस्थित लोकांना काही क्षण टाळ्या वाजवून आपल्या खेळाडूंचा सन्मान करावा.

गरीब मुलांमधील कुपोषणाबद्दल चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक गरिबांना पोषण देणे हे देखील सरकारची प्राथमिकता आहे. गरीब मुलांमध्ये कुपोषण आणि पौष्टिक पदार्थांचा अभाव विकासात अडथळा आणतो.सरकारने वैद्यकीय शिक्षणात सुधारणा केल्या, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा सुधारल्या. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गावाला दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्त औषध दिले जात आहे.सरकार जे तांदूळ त्याच्या वेगवेगळ्या योजनांखाली गरीबांना देते, ते पोषणयुक्त करेल. रेशन दुकाने, मध्यान्ह भोजन, प्रत्येक योजनेअंतर्गत उपलब्ध तांदूळ 2024 पर्यंत पोषकयुक्त केले जातील. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना, सन्मान असावा, यासाठी प्रशासन, पोलिस, नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी. हा संकल्प स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा संकल्प बनवायचा आहे असे मोदी म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here