CBSE 10 आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

0
63
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत होणार

CBSE ने 10 आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 10 वीच्या परीक्षा 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत घेण्यात येणार आहे.12 वीच्या परीक्षा 1 ते 22 डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे.

सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचं CBSE ने स्पष्ट केलं आहे. सुरूवातीला कमी महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे. शिक्षण मंडळानं सांगितलं की, परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी (दीड तास) देण्यात येईल. मात्र, हिवाळ्यात परीक्षा सकाळी 10:30 ऐवजी 11:30 वाजता घेण्यात येईल.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 20 मिनिटं रीडिंग टाईम देण्यात येईल. या परीक्षामध्ये बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील.पहिल्या सत्रासाठी परीक्षा विभाग प्रश्नपत्रिका आणि मूल्यांकन योजना शाळांमध्ये पाठवणार. पहिल्या टप्प्यात परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात येतील.परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. परीक्षेत ओएमआर शीट भरल्यानंतरच पेनाचा प्रयोग करावा लागेल. पेन्सिलीचा प्रयोग अमान्य असेल. मार्च-एप्रिल 2021 मध्ये दुसऱ्या टप्प्यात परीक्षा घेतल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here