🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ पणजी:
बॉलीवूड – हॉलीवूडच्या चित्रपटांचे इफ्फीत वर्ल्ड आणि एशिया प्रीमियर होत असून अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या मिसेस चित्रपटाचा प्रीमियर काल पार पडला. सान्या मल्होत्राच्या मिसेस चित्रपटाचा प्रीमियर पणजीतील आयनॉक्समध्ये पार पडला. या प्रीमियरला सान्या स्वत: हजर होती. सान्या मल्होत्रा इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यापासून गोव्यात हजर आहे. उद्घाटन सोहळ्यात तिने सुरुवातीला रेड कार्पेटवर हजेरी लावली. त्यानंतर रात्री उद्घाटन सोहळ्यात विविध गाण्यावर सादरीकरण केले. गोव्यात इफ्फीतील क्षणचित्रांचा एक व्हिडिओ सान्याने पोस्ट केला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-हौशी-मराठी-राज्य-नाट्य-स्/