वेंगुर्ला –मठ देवस्थानचे मानकरी सुभाष ठाकूर यांची वहिनी कै रत्नप्रभा रमेश ठाकूर वय 65 रा. पेडयेवाडी मठ ता वेंगुर्ला यांचे दिनांक 29.8.2024 रोजी दुपारी 3.30 वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुली जावई नातवंडे पुतणे दिर जाऊ पुतणी पुतण्या असा परिवार आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
[…] मुबंई- (न्यूज वृत्तसेवा) – अनिल अंबानी यांच्या कंपनीला चालविण्यासाठी दिलेले बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि धाराशिव हे पाचही विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंतर्गत विमानसेवा सक्षम व्हावी यासाठी राज्य सरकारने ते पाच विमानतळ काही वर्षापूर्वी अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपमेंट लिमिटेड’ या कंपनीस ९५ वर्षांच्या भाडेपट्टा करारनाम्यावर दिले होते. वरीलपैकी नांदेड विमानतळ ‘स्टार एअर एअरलाईन्स’मार्फत सुरू झाले आहे, तर इतर विमानतळांचे कामकाज ठप्प असल्याने महामंडळाने रिलायन्ससोबतचा करारनामा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कै-रत्नप्रभा-रमेश-ठाकूर-… […]