Kokan: कॉमन सर्व्हीस सेंटर( ई सेवा केंद्र) चे उद्घाटन देवगड तालूका सहाय्यक निबंधक मा.श्री.अनिल राईंज साहेब यांच्या हस्ते

0
38
ई सेवा केंद्र उद्घाटन देवगड ता.स.निबंधक मा.श्री.अनिल राईंज साहेब यांच्या हस्ते
ई सेवा केंद्र उद्घाटन देवगड ता.स.निबंधक मा.श्री.अनिल राईंज साहेब यांच्या हस्ते

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

देवगड – ७० व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाच्या निमित्ताने देवगड मधील शिरगांव विकास सेवा सोसायटी लि .शिरगांव संस्थेमध्ये कॉमन सर्व्हीस सेंटर( ई सेवा केंद्र) चे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन देवगड तालूका सहाय्यक निबंधक – मा.श्री.अनिल राईंज साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-येथे-सचिन-वाला/

या सहकारी सप्ताहाच्या कार्यक्रमाला देवगड तालुका सहाय्यक निबंधक -मा.श्री.अनिल राईंज साहेब, शिरगाव-शेवरे गावचे सरपंच मा.श्री.समिर शिरगांवकर,गावचे उपसरपंच -मा.श्री.संतोषकुमार फाटक,देवगड तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी मा.श्री.जाधव साहेब,जिल्हा बँक देवगड तालुका विकास अधिकारी मा.श्री.संजय परब साहेब,सिंधुदुर्ग जिल्हा सह.मंडळाचे अधिकारी मा.श्री.पांचाळ साहेब,शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री.ऐनापुरे सर,साळशी विकास सेवा सोसा.लि.साळशीचे अध्यक्ष मा.श्री.सत्यवान सावंत साहेब,शिरगांव विकास सेवा सोसा. लि.संस्थेचे माजी चेअरमन मा.श्री.रविकांत साटम साहेब कुवळे विकास सेवा सोसायटी लि.कुवळे संस्थेचे सचिव श्री.पुंडलिक लाड,शिरगांव विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष मा.विश्राम गंगाराम लोके,उपाध्यक्ष मा.श्री.विनायक विष्णू साटम संस्थेचे सर्व संचालक/संचालिका व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here