दापोली- तालुक्यातील जिल्हा परिषद कोंगळे मराठी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव दिन’ साजरा करण्याता आला. यानिमित्त शाळेत प्रभात फेरी व नवगतांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कोंगळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश साळवी, उपाध्यक्ष साक्षी साळवी, विठ्ठल मोहित, उज्वला साळवी, निकिता साळवी, नम्रता साळवी, अश्विनी साळवी , साक्षी रेवाळे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-प्रवेशोत/
प्रवेशोत्सव कार्यक्रमानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व खाऊ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. याशिवाय कोंगळे गावातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने सन्मान करण्यात आला. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शाळेतील शिक्षक हनमंत गरंडे यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रियांका वसावे यांनी सर्वांचे आभार मानले.