दापोली- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या अध्यक्षपदी दापोली येथील प्रथितयश कवी चेतन राणे यांची सर्वानुमते निवड झाली असून दापोलीच्या साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दापोली शाखाध्यक्षा रेखा जगरकल यांनी काही महिन्यांपुर्वी वैयक्तिक अडचणींमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आपोआपच दापोली तालुका कार्यकारिणी बरखास्त झाली होती. https://sindhudurgsamachar.in/kokan-अर्चना-घारे-यांनी-वेधले-र/
मात्र दापोलीसारख्या थोर विचारवंत, साहित्यिक व समाजसुधारकांच्या कार्याचा वारसा लाभलेल्या प्रांतात कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा नव्या जोमाने परत उभी रहावी यासाठी दापोलीतील साहित्यिक व विचारवंतांच्या नुकत्याच झालेल्या सभेत कोमसापची नवी तालुका कार्यकारिणी स्थापन करून पुनर्रचना करण्यात आली आहे. या सभेसाठी कोमसापचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. एनंद शेलार, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, मालगुंड येथील आद्यकवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, दापोलीतील अनेक साहित्यिक, विचारवंत व साहित्यप्रेमी उपस्थित होते. या सभेत कोमसाप दापोली शाखेची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.
कोमसाप दापोली शाखेच्या अध्यक्षपदी चेतन राणे, उपाध्यक्षपदी सुनील कदम, कुणाल मंडलीक, सचिवपदी संदेश राऊत, सहसचिवपदी अरविंद मांडवकर, कोषाध्यक्षपदी मुश्ताक खान, जनसंपर्क प्रमुखपदी बाबू घाडीगांवकर, जिल्हा प्रतिनिधीपदी मुश्ताक खान यांची, सल्लागारपदी कैलास गांधी, संदीप राजपुरे तर सदस्यपदी मंगेश मोरे, संदीप यादव, शमशाद खान, जतीन साळगांवकर, स्मिताली राजपुरे, श्यामल जालगांवकर, रेश्मा तांबे, राजेश पवार, श्रेया भावे, यासिर परकार यांची, तर वेदिका राणे यांची महिला विभाग प्रमुपदी, तेजस मेहता यांची युवा शक्ति प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रा. आनंद शेलार, माधव अंकलगे, गजानन पाटील आदींनी मनोगत व्यक्त करून कोमसाप दापोलीच्या नवनियुक्त कार्यकारिणीस पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.