Kokan: चंद्रनगर शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस

0
26
आंतरराष्ट्रीय योगा दिवस
चंद्रनगर शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस

दापोली- दापोली तालुक्यातील चंद्रनगर जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकताच आंतरराष्ट्रीय योगा दिवस विविध योगासने व व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिके करून साजरा करण्यात आला.
चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी योगासनांचे असलेले महत्त्व विविध उदाहरणांनी पटवून दिले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार व योगासने केली. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपण यापुढे दररोज सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार व योगासनांचा सराव करणार असल्याचे सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-योगाभ्यासाला-उत्स्र्फू/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here