वेंगुर्ला /प्रतिनिधी- आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्लातर्फे जयवंत दळवींच्या जन्मवशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साहित्य जागर हा उपक्रम सुरू करीत आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना साहित्य विषयक अभिरुची निर्माण करणारे मार्गदर्शन मंडळाच्या अध्यक्ष व लेखिका वृंदा कांबळी करणार आहेत. याचा शुभारंभ १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ला हायस्कूलमध्ये करण्यात येणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-पर्यावरणाच्या-संवर्धान/
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वेंगुर्ला हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एस.एस.काळे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी पारितोष कंकाळ तसेच जयवंत दळवींचे पुतणे सचिन दळवी व मालवणी कवी विनय सौदागर आदी उपस्थित राहणार आहेत. वृंदा कांबळी या विद्यार्थ्यांना साहित्य विषयक विशेष मार्गदर्शन करणार आहेत. तरी रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सचिव प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी केले आहे.