Kokan: जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने रक्तदात्यांचा सन्मान

0
23
जागतिक रक्तदान,
जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने रक्तदात्यांचा सन्मान

वेंगुर्ला प्रतिनिधी मानव कितीही प्रगत झाला तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. त्यामुळे माणसाचा प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने रक्तदान उपक्रम घेणारी संस्था आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान करणारे रक्तदाते यांचा वेंगुर्ला भाजपाच्यावतीने सन्मान करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-वारक-यांसाठी-देवदर्शन-सह/

      यामध्ये गेल्या ९ वर्षांमध्ये सलग २५ वेळा रक्तदान शिबिरे आयोजित करणारी तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान संस्था तसेच २९ वेळा रक्तदान करणारे वेताळ प्रतिष्ठानचे खजिनदार माधव तुळसकर यांच्यासह शेखर काणेकर, सुधीर पालयेकर आणि रक्तदान शिबिर आयोजनात अग्रणी असणारे किरण राऊळ यांचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, श्रेया मयेकर, प्रशांत खानोलकर, मनवेल फर्नांडीस, पपू परब, किरण कुबल, जयंत मोंडकर, सुरेंद्र चव्हाण, रवि शिरसाट, राजन केरकर, छोटू कुबल आदी उपस्थित होते.

फोटोओळी – रक्तदान शिबिरे आयोजित करणारी संस्था व रक्तदाते यांचा भाजपातर्फे सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here