वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला शहरातील सर्वात जुन्या १५० वर्षे पूर्ण झालेल्या वेंगुर्ला तालुका स्कूल नं.१ च्या दुस-या मजल्यावर दोन वर्गखोल्या व हॉल निर्मितीच्या कामास सुरूवात झाली असून याचा शुभारंभ मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांच्या हस्ते झाला.https://sindhudurgsamachar.in/kokan-नम्रता-कुबल-यांनी-घेतली-श/
शाळेचे माजी विद्यार्थी शांताराम वासुदेव नाईक व कुटुंबियांकडून शाळेच्या दुस-या मजल्यावरील जागेत दोन वर्गखोल्या व विविध कार्यक्रमांसाठी हॉलच्या कामासाठी १० लाख निधी देण्याचे स्पष्ट केले. पण ही देणगी प्रत्यक्ष न देता बांधकामासाठी होणारा खर्च ते स्वतःच करणार आहेत. शुभारंभप्रसंगी देणगीदार शांताराम नाईक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष सोनल राऊळ, माजी अध्यक्ष राजन केरकर, सदस्य संजय पिळणकर, बाळा कोरगांवकर, शिक्षिका गायत्री बागायतकर, कर्मचारी योगिता मिशाळ, ठेकेदार अखिल आरोसकर, महादेव गावडे, शुभ्रा राऊळ, श्वेता आरोसकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – वेंगुर्ला तालुकास्कूल शाळा नं.१मधील वर्गखोली व हॉलच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.