Kokan: त्रिंबक मधील भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

0
18
भाजप कार्यकर्त,
त्रिंबक मधील भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरूच

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे. भाजप कार्यकर्ते नाराज होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. आज मालवण तालुक्यातील त्रिंबक गावातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokanआ-वैभव-नाईक-यांच्या-उपस्थ-2/

यावेळी बोलताना भाजप कार्यकर्ते म्हणाले की कुडाळ-मालवण मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदार संघ शिंदे गटासाठी सोडला गेल्यामुळे आपण नाराज झालो असून आ.वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन त्रिंबक गावातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते त्रिंबक गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटाबाबत असलेली खदखद आता उघड होत आहे.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी त्रिंबक मधील प्रवेशकर्त्यांना दिला आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अजय पवार,विठ्ठल घाडी,अंकुश घाडी, जान्हवी घाडी,अजय पवार, सूरज जाधव,विजय सावंत या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, सोसायटी चेअरमन श्रीकांत बागवे,शाखाप्रमुख संतोष गोरवले,शेखर घाडी,संदीप तेली,श्रेया बागवे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here