Kokan: दीपक केसरकर यांच्या विजयाचा वेंगुर्ला शिवसेनेतर्फे जल्लोष

0
12
दीपक केसरकर,
दीपक केसरकर यांच्या विजयाचा वेंगुर्ला शिवसेनेतर्फे जल्लोष


🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/वेंगुर्ला/ प्रतिनिधी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी ४० हजाराचे मताधिक्य घेत मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल वेंगुर्ला शहराहतील सप्तसागर कॉम्प्लेक्स येथील शिवसेनेच्या वेंगुर्ला तालुका मध्यवर्ती कार्यालयात दीपक केसरकर यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. या जल्लोषाच्यावेळी ‘दीपक भाई हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय, असो शिवाजी महाराज की जय‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.https://sindhudurgsamachar.in/kokan-निकाल-धक्कादायक-असुन-मतद/

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, उपतालुकाप्रमुख सलील नाबर, युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, युवा सेना शहरप्रमुख सागर गावडे, वेंगुर्ला तालुका महिला संघटक दिशा शेटकर, युवती सेना तालुका प्रमुख योगिता कडुलकर, वेंगुर्ला शहर संघटक अॅड.श्रद्धा बाविस्कर-परब, महिला उपशहर संघटक मनाली परब, महिला अल्पसंख्यांक शहर संघटक शबाना शेख, शाखाप्रमुख प्रभाकर पडते, किरण कुबल, संजय परब, राजू परब, देवीदास वालावलकर, यशवंत किनळेकर, बाळा परब, गजानन गांवकर, मनोज पांगम, आपा मांजरेकर, संदेश सडवेलकर तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाप्रमुख सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, माजी नगरसेवक पिटू गावडे, सरपंच पपू परब, प्रशांत खानोलकर, सोमनाथ टोमके, दादा कुबल, मनवेल फर्नांडिस अजित कनयाळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here