Kokan: निरंजन डावखरे यांना मोठ¬ा मताधिक्क्याने निवडून द्या-रविंद्र चव्हाण

0
28
निरंजन डावखरे
निरंजन डावखरे यांना मोठ¬ा मताधिक्क्याने निवडून द्या-रविंद्र चव्हाण


वेंगुर्ला प्रतिनिधी-लोकसभेच्या विजयाप्रमाणे कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठ¬ा मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी कामास लागा. आपल्या तालुक्यातील मतदान 100 टक्के होण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक गावातील भाजपा पदाधिकारी यांनी याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वेंगुर्ला येथील कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या आढावा बैठकीत केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रधानमंत्री-सूर्यघर-यो/

कोकण पदवीधर मतदार संघाच्या 26 जून रोजी होणा-या निवडणूकीच्या पाश्र्र्वभूमीवर भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी वेंगुर्ला तालुक्यातील एकूण मतदार व त्यांचे “आपल्या उमेदवारास मतदान’ याचा तालुका भाजपा पदाधिकारी यांनी केलेल्या कामाची आढावा बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.  यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य दिलीप गिरप, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, प्रदेश सदस्य शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here