Kokan: पर्यावरणाच्या संवर्धानासाठी पर्यटकांनी हातभार लावावा – मुख्याधिकारी कंकाळ

0
17
पर्यावरण संवर्धान,
पर्यावरणाच्या संवर्धानासाठी पर्यटकांनी हातभार लावावा - मुख्याधिकारी कंकाळ

वेंगुर्ला/ प्रतिनिधी- पर्यटकांनी पर्यटन स्थळी उघड्यावर कचरा न टाकता नेहमी कचराकुंडीचा वापर करावा व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छता अभियानप्रसंगी केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-नगरपरिषद-कोकण/

‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवड्याच्या निमित्ताने २८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात जलबांदेश्वर, झुलता पूज व नवाबाग समुद्र किनारा स्वच्छ करून अंदाजित २ टन एवढा कचरा वर्गीकृत करण्यात आला. प्लॅस्टीक पॅकेट्स, प्लॅस्टीक बॉटल्स, काचेच्या बॉटल, खराब झालेली जाळी, थर्माकोल, चप्पल, फायबर, कापड अशा प्रकारचा विलगीकृत कचरा संकलन करून परिसराची साफ सफाई करण्यात आली. तसेच याठिकाणी उभादांडा ग्रामपंचायतीच्या ‘बीच क्लिनिग मशिन‘चा वापर करुन वाळूमधील कचरा गोळा करण्यात आला.

या स्वच्छता मोहीमेत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता दूत डॉ. धनश्री पाटील, बॅ.खर्डेकर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी, उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी, ग्रीन नेचर क्लबचे विद्यार्थी, श्री गणेश महिला बचत गट, दुर्वा महिला बचत गट, गोल्डन महिला बचत गट, क्रांती महिला बचत गट, नवोदय महिला बचत गट, नारायण महिला बचत गट, फातिमा महिला बचत गट, वेलांकानी महिला बचत गट, साईसिद्धी महिला बचत गट, गुरूमाऊली महिला बचत गट, दयासागर महिला बचत गट, समर्थ महिला बचत गट, मनस्वी महिला बचत गट, एकादशी महिला बचत गट, समृध्दी महिला बचत गट, विसोटेश्वर महिला बचत गट, नवदुर्गा महिला बचत गट, अंकुर महिला बचत गट या गटांच्या महिला सदस्य व स्वच्छता प्रेमी वेंगुर्लावासीय नागरिक उपस्थित होते.

फोटोओळी – वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत झुलता पूल येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here